वाढीव घरपट्टी तत्काळ रद्द करावी आ.फारुख शाह यांची अप्पर मुख्य सचिवांकडे मागणी..

धुळे (अनीस खाटिक)
धुळे शहरातील नागरिकांची वाढीव घरपट्टी संदर्भात आ. फारुख शाह यांनी मंत्रालयात अप्पर मुख्य सचिव नगर विकास यांची भेट घेऊन धुळे शहरातील वाढीव घरपट्टी संदर्भात चर्चा केली.यावेळी अप्पर मुख्य सचिव मा.असीम गुप्ता साहेब यांनी महानगर

पालिका धुळे यांना तात्काळ आदेशित केले की वाढीव घरपट्टी संदर्भात तात्काळ प्रस्ताव तयार करून मंत्रालयात सादर करावे याबाबत आ. फारुख शाह यांनी चर्चेमध्ये मा.असीम गुप्ता यांना धुळे शहरातील परिस्थिती अवगत करून दिली की धुळे शहरात रोजगार नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात भेद बेरोजगारी आहे तसेच धुळे शहर हे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या आहे व धुळे शहरातील वाढीव घरपट्टीमुळे शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे शहरात बेरोजगारी असल्यामुळे वाढीव घरपट्टी भरणे जिकरीचे होत आहे.तसेच शहराची शहरात हद्द वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिकांवर वाढीवगरपट्टीचा बोजा पडत आहे. शहराच्या विकासासाठी शासनाच्या निधी कमी पडत असल्यामुळे शहराच्या तसा विकास होत नाही शहरात एमआयडीसी भागात जास्त उद्योग धंदे नसल्यामुळे शहरातील असंख्य नागरिक बेरोजगार आहेत यामुळे यापूर्वी सुद्धा घरपट्टी वाढ करण्यात आली होती त्याचा बोजा आजपर्यंत नागरिक सहन करत आहे. महानगरपालिका शहरातील नागरिकांना सर्व कर घेऊन सुद्धा जसा सुविधा द्यायला पाहिजे तशी सुविधा उपलब्ध करून देण्यात असमर्थ ठरलेली आहे तरी शहराची नागरिकांची परिस्थिती पाहता वाढीवघरपट्टी आपल्या स्तरावर रद्द करून पूर्वीप्रमाणे घरपट्टी लागू करण्यात यावी अशी मागणी आ. फारुख शाह यांनी अप्पर मुख्य सचिव श्री असीम गुप्ता यांच्याकडे एका पत्राद्वारे केलेली आहे त्याला सकारत्मक प्रतिसाद देत श्री.असीम असीम गुप्ता यांनी धुळे महानगरपालिका यांना तात्काळ प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले असून लवकरच धुळेकर नागरिकांची वाढीव घरपट्टी पासून सुटका होईल असे आ.फारुख शाह यांना श्री असीम गुप्ता यांनी आश्वासित केलेले आहे.