गुरू पौर्णमेनिमित्त मंगळ ग्रह मंदीरात पादूका पुजन..

अमळनेर(प्रतिनिधि)
येथील श्री मंगळ ग्रह मंदीरात गुरूपौर्णिमे निमित्त ३ जुलै रोजी सायंकाळी ४ ते ६ वेळेत श्री स्वामीसमर्थ महाराज यांच्या पादुकांचे सेवानिवृत्त मुखयाध्यापक सुरेंद्र सुर्यवंशी व द्रौ.रा.कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सिमा सुर्यवंशी या दाम्पत्याच्या हस्ते पादुका पूजन व अभिषेक झाले. तर श्री मंगळ ग्रह मंदीरात तालुक्यातील झाडी येथील शिक्षक मयूर प्रवीण पाटील यांनी सपत्नीक श्री सत्यनारायण देवतेची महापूजा केली . मंदिराचे पुरोहित प्रसाद भंडारी, जयेंद्र वैद्य, अतुल दीक्षित यांनी पौरहित्य केले. यावेळी मंगळ ग्रह मंदीराचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी यांच्यासह सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.