एरंडोलचा महेंद्र महाजन जी-पॅट परिक्षेत भारतात प्रथम..

एरंडोल ( प्रतिनिधि ) आई-वडील जेमतेम शिकलेले, त्यातच आई गृहिणी तर वडील ड्रायव्हर मात्र त्यांचा मुलगा भारतातून सर्वप्रथम आला ही एरंडोलसाठी खूपच भाग्याची गोष्ट आहे.
शिरपूरच्या आर. सी. पटेल फार्मसीचा महेंद्र (मयुर) अशोक महाजन हा एरंडोलचा रहिवासी असून नुकत्याच जून 2023 मध्ये झालेल्या जी-पॅट (ॠीरर्वीरींश झहरीारलू अिींर्ळीींवश ढशीीं(ॠ-झरीं) या परिक्षेत संपूर्ण भारतातून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविल्याने शिरपूर आर. सी. पटेल संस्थेसह सर्वत्र कौतूक केले जात असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे याच परिक्षेत 100 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर एरंडोलसाठी अखिल भारतीय पातळीवर उज्वल यश संपादन करणारा (फार्मसीमध्ये) पहिलाच विद्यार्थी असावा.
घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असून स्वत:चे कठोर परिश्रम आणि शिरपूरच्या प्राध्यापकांचे बहुुमोल मार्गदर्शन, प्रोत्साहनामुळे महेंद्रने हे यश मिळविले आहे.
सुरूवातीची अनेक वर्षे कासोदा नाका, मयुरी गार्डन हॉटेलच्या मागे छोट्याशा – कुडाच्या घरात राहणार्या ड्रायव्हर म्हणून परिवाराचे पालन-पोषण करणार्या अशोक पंढरीनाथ महाजन यांनी मुलाच्या शिक्षणासाठी दिवस-रात्र कष्ट केले. शिरपूरला शिक्षणासाठी पाठविले. अनेक अडचणींचा सामना करून आई-वडीलांनी शिकविले.