शरद पवारांचे राष्ट्रवादीचे अध्यक्षपद बेकायदेशीर..

24 प्राईम न्यूज 2023
शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे अध्यक्षपद बेकायदेशीर असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांनी याबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहे. त्यानंतर हे प्रसिद्धीपत्रक जारी करत अजित पवार यांनी काही गोष्टींचा दावा केला आहे. त्यामध्ये त्यांनी शरद पवार यांचे अध्यक्षपद बेकायदेशीर आहे, असे म्हटलेय. ११ आणि १२ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या राष्ट्रीय महाअधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि इतर काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. या राष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहून शरद पवार यांच्या बाजूने मतदान केलेल्या व्यक्तींची कोणतीही नोंद नाही, त्यामुळे शरद पवार यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती बेकायदेशीर ठरेल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटलेय