वाढत्या व्यसनाचे प्रमाण देशासाठी घातक व समाजासाठी घातक .. -मौलाना फारूक मदनी

0

धुळे -( अनीस खाटीक)
महाराष्ट्रात व तसेच देशात वाढत्या व्यसनाचे प्रमाण देशासाठी घातक व समाजासाठी घातक बनत आहे लहानपणापासून ते वयोवृध्द नागरिक व्यसनाला बळी पडत असून त्यातून नवनवीन सामाजिक निर्माण होत आहेत मुस्लिम धर्मातील पवित्र धर्म ग्रंथ कुराणात व्यसनाधीनतेला तीव्र मनाई केली असताना मुस्लिम समाजातील तरुण मोठ्या प्रमाणात नशेखोरी करत आहेत त्यामुळे अनेक सामाजिक
समस्यां निर्माण होत असून याला आळा घालणे गरजेचं आहे.व्यसनामुळे कित्येक संसार बरबाद झाली असून महिला विधवा , तर मुलं अनाथ झाल्याचे दिसते.याचा भान ठेवत मुस्लिम समाजातील तरुणांनी व्यसनाधीनते पासुन दुर रहावे असे आव्हान जामीया मिलिया चे हजरत मौलाना
फारुक मदनी यांनी केले
धुळे शहरातील अलहाज जमीर अहमद मुल्ला सर फाऊंडेशन, धुळे यांच्या मार्फत अल्लामा इकबाल चौक, मोलविगंज धुळे येथे नशामुक्त अभियानाचा जागृती पर कार्यक्रम संपन्न झाला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनाब अलहाज मोहम्मद गुफरान मोहम्मद हसन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून,हजरत मौलाना मोहम्मद फारूक मदनी जमिया इस्लामीया अक्कलकुवा ,हजरत मुफ्ती सैय्यद मोहम्मद कासीम जीलानी मदरसा फलाहे दारेन धुळे , सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाटील नशा मुक्ति मंडळ धुळे, हाफिज हिफुजुरहेमान इत्यादी उपस्थित होते
यावेळी मुफ्ती कासिम जीलानी यांनी ही मार्गदर्शन केले यावेळी नशामुक्ती मंडळा तर्फे पोस्टर प्रदर्शन केले होते
सूत्रसंचालन हजरत मुफ्ती वलीद यांनी केले तर आभारप्रदर्शन इस्माईल सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निहाल अहमद, आतीक अहमद, अनिस अहमद , खालिद अजीज इत्यादी नी प्रयत्न केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!