जरंडीच्या नदीला सलग दुसऱ्या दिवशी पूर.जरंडीचा सम्पर्क तुटला.

जरंडी(साईदास पवार) जरंडीसह परिसरात गुरुवारी चार वाजता मुसळधार पावसाने तुफान तडाखा दिल्या मुळे शेतीची कामे ठप्प झाली होती दरम्यान बुधवार( दि.०५) जरंडी च्या नदीला पूर आल्यावर पुन्हा सलग दुसऱ्या दिवशीही नदीला पूर आला त्यामुळे जरंडीचा संपर्क तुटला होता..
जरंडी परिसरात झालेल्या पावसाने गुरुवारी शेतातील पाणी वाहून गेल्या मुळे या पाण्यात शेती पिकांसह बंधारे वाहून गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे दरम्यान जरंडी नदीला पूर आल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शाळेत च अडकावे लागले होते सायंकाळी उशिरा पूर ओसरला होता बुधवारी अन गुरुवारी झालेल्या पावसाने खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे दरम्यान गुरुवारी सकाळ पासून जरंडी सह परिसरात खरिपाच्या पिकांना खतांची मात्रा देण्याचे काम हाती घेतले मात्र दुपारी तीन वाजेनंतर सुरू झालेल्या पावसाने खते वाहून गेली आहे…