सोयगावात शिरले नाल्याच्या पुराचे पाणी;शासकीय निवासस्थाने पुराच्या विळख्यात..

जरंडी (साईदास पवार) सोयगाव शहरात गुरुवारी दुपारी चार वाजता झालेल्या मुसळधार पावसाने शहरालगतच्या नाल्याच्या पुराचा सायंकाळी जोर वाढल्याने सोयगावात पुराचे पाणी शिरल्याने शहरात खळबळ उडाली दरम्यान पुराचे पाणी थेट सोयगाव-बनोटी रस्त्यावर आल्या मुळे शहराची वाहतूक ठप्प झाली मात्र पूर स्थळी कोणतीही यंत्रणा हजर झाली नव्हती दरम्यान नाल्याच्या पुराने सोयगाव तहसील कर्मचाऱ्यांचे निवासस्थानला विळखा घातल्याने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना जीव मुठीत घेवून घरात थांबावे लागले होते या पुरात कोणताही अनर्थ घडला नाही
सोयगाव शहराला पावसाने जोरदार बॅटिंग केली त्यामुळे सोयगावच्या जंगलातून वाहून येणाऱ्या नाल्याला मोठा पूर आला होता या पुराचे पाणी शहरातील रस्त्यावर पसरले होते पुराचे पाणी नियंत्रीत होत नसल्याने पुराच्या पाण्याने सोयगाव तहसील कार्यालयाच्या निवासस्थानाला विळखा घातला होता दरम्यान नाल्याच्या पुराचे पाणी तासभर ओसारले नव्हते त्यामुळे सोयगागावात गोंधळ निर्माण झाला होता पुराच्या पाण्याने तहसीलदार सोयगाव यांचे निवास स्थान पुराच्या पाण्यात होते तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना जीव मुठीत घेवून घरात बसावे लागले होते दरम्यान सोयगाव तहसील च्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाच धोका निर्माण झाल्यावरही तालुका प्रशासन च्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने कोणतीही मदत कार्य केले नव्हते दरम्यान तहसीलदार रमेश जसवंत यांचेशी याबाबत संपर्क साधला असता फर्दापुर तलाठ्यांना अतिवृष्टीच्या निधीसाठी तातडीची बैठकीत आहे परत आल्यावर बघतो असे त्यांनी सांगितले…