शिवसैनिकांनी आपल्या महिलांना संघटना व उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी सक्रिय करा. -अंजली नाईक

अमळनेर (प्रतिनिधि)प्रत्येक शिवसैनिकाने आपल्या घरातील महिला आणि महिला शिवसैनिकाने घरातील पुरुषाला संघटना व उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी सक्रिय करा असे आवाहन मुंबई महापालिकेच्या माजी शिक्षण सभापती तथा महिला
आघाडीच्या जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख अंजली नाईक यांनी महिला आघाडीच्या
आढावा बैठकीत केले.यावेळी सरवर शेख या मुस्लिम तरुणाने शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश घेतला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार पक्ष बांधणी सुरू केली असून पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र भर दौरे सुरू केले आहेत. अमळनेर येथे महिला आघाडीची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ , जिल्हा प्रमुख महानंदा पाटील यांनी कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले. व आगामी निवडणुकांसाठी सज्ज रहा असे आवाहन केले.व्यासपीठावर तालुका प्रमुख श्रीकांत पाटील , नरेंद्र ठाकोर हजर होते.
कार्यक्रमास महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख मनीषा परब , विधानसभा क्षेत्र प्रमुख उज्वला अंधारे , शहर प्रमुख सुरज परदेशी , उज्वला कदम ,उपतालुका प्रमुख बाळासाहेब पाटील (खर्दे), रवींद्र पाटील ,उपशहर प्रमुख सुनीता माने नगरसेवक प्रताप शिंपी , नितीन निळे ,देवेंद्र देशमुख , मोहन भोई , उमेश अंधारे,जिवन पवार, मयूर पाटील यांच्यासह महिला कार्यकर्त्या हजर होते. सूत्रसंचालन व आभार चंद्रशेखर भावसार यांनी केले.
