पिंपळकोठ्याजवळ पोलिस असल्याचे सांगून 40 हजारात लुटले..

एरंडोल (प्रतिनिधि) तालूक्यातील पिंपळकोठ्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर तीन इसमांनी पोलिस असल्याचे सांगून जळगांव येथील दाम्पत्याकडून 44 हजार किंमतीची सोन्याची अंगठी घेवून पसार झाले. याबाबत एरंडोल पो. स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगांव येथील एमएसईबी विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी अच्युतराव एकनाथ शिंदे हे आपल्या पत्नीसह काल (दि. 6)एरंडोल येथील मित्र मोहित परदेशी यांना भेटण्यासाठी एरंडोलला येत होते. दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास पिंपळकोठ्याजवळ आले असता तीन काळ्या रंगाचे जॉकेट घातलेल्या इसमांनी त्यांना थांबवून आम्ही पोलिस असल्याचे सांगून गाडीची तपासणी करण्याचा बहाणा करून त्यांचे जवळील 7 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत सुमारे 44 हजार) घेवून पसार झाले. याबाबत एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एरंडोल पोलिस करीत आहेत.