नगरपरिषद संचालनालयाचे संचालक किरण कुलकर्णी यांची अमळनेर पालिकेस धावती भेट..

अमळनेर(प्रतिनिधि)
संघटनेने कर्मचाऱ्यांसाठी केली सात कोटींची मागणी
अमळनेर-महाराष्ट्र राज्याच्या नगरपरिषद संचालनालयाचे संचालक किरण कुळकर्णी यांनी काल दि 8 रोजी अमळनेर नगरपरिषदेत धावती भेट दिली,यावेळी त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला.
परिषदेची थोडक्यात माहिती त्यांनी जाणून घेतली यावेळी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सोमचंद संदानशिव यांनी श्री कुलकर्णी साहेबांचा शाल, व बुके देऊन सत्कार करून डीएमए कडे अंमळनेर नगरपरिषदचे 7 कोटी बाकी असल्याने ती अदा करण्याची मागणी केली तसेच १०,२०,३०आश्वासित प्रगती योजना,डिसीपीएस जुनी पेन्शन योजना लागू करणे आदी मुद्दे मांडले,यावर संचालकानी केलेल्या मागण्याची दखल घेऊ असे आश्वासन दिले आहे. तसेच, या प्रसंगी अंमळनेर नगरपरिषदेच्या विविध विभागानी आपापल्या विभागाचे उत्कृष्ट पणे सादरीकरण केल्याने संचालकानी कौतुक केले. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेही त्यांनी कौतुक केले.यावेळी या वेळी बांधकाम अभियंता, अमोल भामरे, नगर अभियंता श्री वाघ , पाणीपुरवठा अभियंता, श्री बैसाणे , सत्यम पाटील, श्री तोंडे, आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे, हैबतराव पाटील, लाईट अभियंता प्रशांत ठाकूर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.