देशमुख मढी एरंडोल येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य संकीर्तन व संगीतमय रामायण कथा महोत्सव..

एरंडोल ( प्रतिनिधि ) येथिल सुप्रसिद्ध देशमुख मढी येथे आजपासून श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने श्रीगुरु रामदास बाबा वरसाडेकर व श्रीगुरु नामदेव बाबा भामरे रवणजे कर आणि वै ह भ प भिका बाबा देशमुख यांचे आशिर्वादाने आणि श्री ह भ प विजय महाराज भामरे अध्यक्ष, श्री क्षेत्र सुकेश्वर देवस्थान यांचे मार्गदर्शनाने व देशमुख मढी पंच मंडळ व समस्त ग्रामस्थ भाविक भक्त यांचे सहकार्याने भव्य संकीर्तन व संगीतमय रामायण कथा प्रारंभ होत असून आज सकाळी संत सावता महाराज मूर्तीचे पूजन श्री हर्षल सुरेश देशमुख यांनी सपत्नीक केले.अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या कार्यक्रमात दररोज सकाळी 9 ते 11 व दुपारी 3 ते 5 भव्य संगीतमय रामायण कथा निरूपण वारकरी रत्न श्री ह भ प भागवत महाराज शिरसोली कर करणार असून दररोज रात्री 9 ते 11या वेळेत खान्देश रत्न ह भ प पोपट महाराज कासारखेडेकर ह भ प संध्या ताई माळी सुरत,श्री ह भ प विजय महाराज एरंडोल, ह भ प महेश महाराज, बालकीर्तनकार, ह भ प ज्ञानेश्वर माऊली , बेलदारवाडी, ह भ प सुधाकर महाराज ,मेहुण,ह भ प प्रकाश महाराज , अमळनेर, व ह भ प शांताराम महाराज , शेंदूरणी कर यांचे कीर्तने होणार आहेत या कार्यक्रमात ह भ प वासुदेव महाराज, खोकराळेकर ह भ प रवींद्र महाराज,लामकाणीकर,ह भ प पावबा महाराज, वैदाने कर ,ह भ प कालिदास महाराज खेडगाव कर उपस्थित राहणार असून सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री विनोद नारायण देशमुख अध्यक्ष व श्री भगवान पुंडलिक देशमुख उपाध्यक्ष, व श्री गणेश देशमुख ,श्री सुरेश देशमुख व सर्व विश्वस्त यांनी देशमुख मढी तर्फे केले आहे.