नगर पालिका एरंडोल चे दीपक गोस्वामी
महिन्याचे “सर्वोत्कृष्ट कर्मचारी”

एरंडोल ( प्रतिनिधि ) एरंडोल नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांनी (जून-२०२२) पासून न.पा.च्या कर्मचारी वर्गासाठी नवीन उपक्रम सुरु केलेला आहे.
“महिन्याचे सर्वोत्कृष्ट कर्मचारी” हा उपक्रम सुरु केला असून, सदरील उपक्रमामध्ये नगरपालिकेतील सर्व सफाई कामगार, शिपाई, कार्यालयीन कर्मचारी आणि अधिकारी यांचा समावेश असणार आहे.
जून-२०२३ चे सर्वोत्कृष्ट कर्मचारी . दिपक गोसावी (शिपाई) यांची निवड करण्यात आलेली आहे.
त्यांच्या अमूल्य कार्य आणि प्रयत्नांसाठी, एरंडोल नगर परिषद त्यांना महिन्यातील सर्वात उत्कृष्ट कर्मचारी म्हणून ओळखते. तुमच्या प्रयत्नांबद्दल अभिनंदन!