वाहक किशोर पाटील कर्तृत्ववान कामगार पुरस्काराने सन्मानित..

एरंडोल (प्रतिनिधि)येथील एसटी आगारातील वाहक भुपेंद्र (किशोर) राजाराम पाटील यांना एरंडोल आगार क्षेत्रातील कर्तृत्ववान आदर्श कामगार पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय जळगांव कामगार केंद्र पिंप्राळा आयोजित महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आल्याने किशोर पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.