एरंडोल पोलीस स्टेशन तर्फे एरंडोल शहरातील तमाम नागरिकांना आवाहन.

एरंडोल ( प्रतिनिधि ) रोजी एरंडोल शहरातील पांडव वाडा वास्तू संदर्भात माननीय जिल्हाधिकारी, जळगाव हे निकाल देणार आहेत.
निकाला संदर्भात कोणीही गैरसमज निर्माण होतील असे संदेश किंवा मेसेज, अफवा

, व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम व इतर सोशल मीडिया माध्यमाद्वारे प्रसारित करू नये. असे मेसेज कोणाला प्राप्त झाल्यास फॉरवर्ड करू नये. सर्व ग्रुप ॲडमिन यांनी याबाबत आपापल्या ग्रुप मध्ये सदस्यांना सूचना द्यावी.
एरंडोल पोलीस स्टेशन, सायबर पोलीस स्टेशन, सोशल मीडिया सेल, गुप्तहेर शाखा यांचे याबाबत सुरू असलेल्या घडामोडींवर बारीक लक्ष आहे. कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच एरंडोल शहरात जमावबंदी कलम 144 लागू असून कोणीही अनावश्यक जमाव अथवा गर्दी जमविणार नाहीत.
एरंडोल शहरात पोलीस बंदोबस्त तैनात आहे. तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये याबाबत काही तक्रार असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करावा.
सतीश गोराडे,पोलिस निरीक्षक एरंडोल पोलिस स्टेशन यानी आवाहन केले आहे..