दीप अमावस्येच्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एरंडोल परिसरात दोन दुर्घटना..

0


एरंडोल(प्रतिनिधि )दीप अमावस्येला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पिंपळकोठा जवळ दोन दुचाकींची आमने सामने टक्कर होऊन चार जण जखमी झाले.पळासदड गावाजवळ ओमनी व दुचाकीच्या अपघात होऊन तीन जण जखमी झाले. या दोन्ही अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना अमोशा भोवली की काय असे म्हटले तर वावगे होणार नाही.
पिंपळकोठा गावानजीक झालेल्या अपघातात शुभम दगडू महाजन १७ हा गंभीर जखमी झाला असून त्याला जळगावला उपचारार्थ हलवण्यात आले आहे तर
किरण राजेंद्र बडगुजर वय २३, हा किरकोळ जखमी झाला आहे. दोन्ही राहणार एरंडोल.
फळासदड नजीकच्या अपघातात दुचाकीने रॉंग साईडने येऊन ओमनी गाडीला धडक दिली असे समजते. या अपघातात सुनील मधुकर सोनवणे वय ३८ हा गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. रवींद्र खंडू पवार वय २५ दिलीप खंडू पवार वय २६ हे सुद्धा जखमी झाले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक शरद बागल , व त्यांचे सहकारी यांनी अपघात ठिकाणी जाऊन तत्परतेने मदत केली तर आरोग्य दूत विकी खोकरे याने स्वतःच्या वाहनाने जखमींना जळगाव येथे रुग्णालयात हरवले.
या दोन्ही घटनांबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!