खान्देशाचे नाव अधोरेखीत होणारे मराठी साहित्य संमेलन व्हावे -डॉ. अविनाश जोशी..

एरंडोल (प्रतिनिधी) – साहित्य हे समाजमनाचा आरसा असून समाजभान सजग ठेवण्यास ठायी ठायी कामी येतं. साहित्यानं आजवर जी स्थित्यंतरं आणि परिवर्तने स्वीकारलीत ती सारी समाज हिताचीच ठरलीय. अशा साहित्यसेवेची संधी आपल्या खान्देशाला 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मिळालीय. फेब्रुवारी 2024 मध्ये अमळनेर येथे संपन्न होत असलेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भातील मार्गदर्शन सभेत म. वा. मंडळ अध्यक्ष अविनाश जोशी यांनी सभेस उपस्थित साहित्यिक, रसिक वर्गाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खान्देशचे नाव अधोरेखित होणारे मराठी साहित्य संमेलन व्हावे असे प्रतिपादन केले. येथील सुर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. जोशी यांनी संमेलनाच्या नियोजनासंदर्भात एक कृती आराखडा सादर करून बहुसंख्येने सहभाग नोंदवण्यासबंधी आवाहन केले. उपस्थित संमेलन आयोजक समितीचे स्वागत सत्कार यावेळी करण्यात आले. सदरप्रसंगी शरद सोनवणे, नरेंद्र निकुंभ, प्रा. वा. ना. आंधळे, कवी विलास मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन कवी निंबा पुना बडगुजर यांनी तर आभार प्रवीण महाजन यांनी मानले. सभेस सोमनाथ ब्रम्हे, पी. जी. चौधरी, प्रा. सचिन पाटील, प्रा. ए. टी. चिमकर, प्रा. विमल वाणी, प्रा. शारदा पाटील, मनीषा रघुवंशी, प्रा. रघुनाथ निकुंभ, बी. के. धूत सर, रवींद्र लाळगे सर,मंगला रोकडे, विनायक कुलकर्णी, मानुधने मॅडम, सौ.पाटील मॅडम यांचेसह साहित्य रसिकांनी उपस्थिती दिली.