पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या करिअर समुपदेशन शिबीराचे आयोजन!

एरंडोल ( प्रतिनिधि) आज दि.२२ जुलै रोजी पोदार इंटरनॅशनल स्कूल, जळगाव येथे विद्यार्थ्यांसाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या करिअर समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले.
समितीने आयोजित केलेल्या सी ए क्षेत्रात करिअर व त्यासाठी लागणारी पूर्व तयारी याविषयी समुपदेशन करण्यात आले. वाणिज्य शिक्षण,आर्थिक साक्षरता, शिक्षण सुधारणांना चालना देणे या उद्देशाने उपरोक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
अभिषेक कोठारी यांच्या सहकार्याने करिअर समुपदेशन कार्यक्रमातून पोदार स्कूलच्या ई.८ वि ते १० वी च्या विद्यार्थ्यांना श्री रोशन रुणवाल(सी ए) यांनी संबोधित केले. चार्टर्ड अकाउंटंट्स हा व्यवसाय समाजात प्रतीष्ठित असून सी ए क्षेत्राचा व्याप व संधी तसेच इन्फ्रास्ट्रक्चरल इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट या विषयी माहिती दिली.
श्रुतिका सुजित मुथा(सी ए) यांनी सीए अभ्यासक्रमाची तपशीलवार माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.अंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असणाऱ्या व्यावसायिक संधीबद्दल अवगत केले.
विद्यार्थ्यांना देखील त्यांनी जिज्ञासेतून विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळाली व अमूल्य मार्गदर्शन लाभले .
शाळेचे प्राचार्य श्री गोकुळ महाजन यांनी प्रमुख मार्गदर्शक श्री रोशन रुणवाल व श्रुतिका सुजित मुथा यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.विद्यार्थ्याना मार्गदर्शन केल्याबद्दल पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने त्यांचे आभार मानून सन्मानचिन्ह देवून गौरव केला.
याप्रसंगी शाळेचे उपप्राचार्य श्री दिपक भावसार ,पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ.उमा वाघ ,शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.