अभियंता नगर येथील रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे शुभहस्ते संपन्न..

धुळे ( अनीस खाटीक )
प्र. क्र.५ अभियंता नगर, वाडी भोकर रोड, येथे २५लक्ष रुपयाचे काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन आ.फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले. या

भागातील नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी होती त्या अनुषंगाने आ.फारुख शाह यांनी त्या मागणीची तात्काळ दखल घेत महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोई सुविधांचा विकास योजना अंतर्गत १० कोटि रुपये मंजूर करून घेतले व आज आमदार साहेबांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. वाडीभोकर रोड परिसरात अनेक कॉलनी असून अभियंता नगर येथे रस्ता काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या भागातील नागरिकांनी अनेक आमदार निवडून दिले परंतु आज पर्यंत कोणीच या भागाचा विकास केलेला नव्हता परंतु आमदार फारुक शाह यांच्या धुळे शहराचा विकासाच्या ध्यास बघता या भागातील नागरिकांनी एका निवेदनाद्वारे आमदार फारुक शहा यांच्याकडे या भागातील समस्या मांडल्या होत्या त्याला तात्काळ प्रतिसाद देत आमदार फारुक शाह यांनी २५ लक्ष रुपयांचा रस्ता मंजूर करून घेतला.
धुळे शहरातील रस्त्यांच्या बाबतीत कोणत्याच आमदारांनी गंभीरपणे विचार केला नव्हता परंतु आ.फारुख शाह यांनी धुळे शहरातील प्रमुख महामार्गाला लागून असलेल्या रस्ते तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी शेकडो कोटीच्या निधी आज शहरवासीयांना उपलब्ध करून दिलेला आहे. जातीपातीचे राजकारण न करता सर्वांना न्याय देण्याची भूमिका आमदार फारुक शाह यांची राहिलेली आहे, त्यामुळे शहरातील सर्व भागातील रस्ते चकाचक होऊन गेलेले आहे. भविष्यात अशा अनेक विकासाचे कामाचे ध्येय आमदार फारुक शहा यांच्या मनात आहे. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांनी आ.फारुख शाह यांचे आभार मानून सत्कार केला यावेळी आ.फारुख शाह यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धिरज ईसे,डॉ. दिपश्री नाईक,डॉ.बापुराव पवार,प्यारेलाल पिंजारी,निजाम सैय्यद,आसिफ शाह,,नाना वाणी,हेमंत कुलकर्णी,प्रकाश बोरवाल, इंजिनियर टी.आर.पाटील,शशिकांत शिंपी,राजू सोलंकी, डी.बी.पाटील,अनिल जोशी,मधुकर खरात,आबा मराठे,सजन चौधरी,राज कदम,एन.एस.चव्हाण,शाहिद शाह, सउद आलम, आदी उपस्थित होते.