वेटर च्या खून प्रकरणी हॉटेल मालकास चार दिवस पोलीस कोठडी..

अमळनेर (प्रतिनिधि)वेटर च्या डोक्यावर लोखंडी वस्तूने मारहाण करून त्याचा खून केल्या प्रकरणी अटकेतील आरोपी नरेंद्र उर्फ भटू यशवंत चौधरी यास काल दि 22 रोजी अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि 25 पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सदर प्रकार तीन महिन्यांनी
. सीसीटीव्ही तून उघडकीस आल्याने पोलिसांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू उर्फ बाबूभाई नारायण पाटील असे मयतांचे नाव असून नरेंद्र उर्फ भटू यशवंत चौधरी वय ३५ रा माळीवाडा असे आरोपीचे नाव आहे. नरेंद्र चौधरी याची सुजाण मंगल कार्यालयाजवळ साई व रुपाली हॉटेल असून दगडू पाटील हा तेथे वेटर म्हणून काम करीत होता. दगडू पाटील गेल्या पंधरा वर्षांपासून आपल्या सुरत येथे राहणाऱ्या कुटुंबापासून वेगळा राहून अमळनेर येथे हॉटेल वर काम करीत होता.सुरवातीला हॉटेल मालक नरेंद्र चौधरी याने २२ एप्रिल रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिली की सकाळी सहा वाजता हॉटेल कडे चक्कर मारला असता दगडू पाटील खाली दगडावर पडलेला होता. त्याच्या डोक्याला जखम होती व छातीला खरचटले होते. तेथून नरेंद्र याने खाजगी रुग्णवाहिकेने धुळे येथे उपचारासाठी दाखल केले होते. तेथून त्याला सुरत येथे नातेवाईकांच्या ताब्यात देऊन उपचारासाठी दवाखाण्यात दाखल केले होते. ६ मे रोजी त्याचा सुरत येथे मृत्यू झाला होता.