अमळनेर येथे हजरत अब्दुल रज्जाक शाह पिरबाबा यांचा उर्स…

अमळनेर(प्रतिनिधि ) अमळनेर तालुक्यातील धार येथे एकात्मतेचे प्रतीक असलेला पिरबाबांचा
उरूस दरवर्षी इस्लामी महिन्यातील मोहरमच्या चार व पाच तारखेला साजरा करण्यात येतो यावर्षी दिनांक 23 जुलै रविवार रोजी संदल तर 24 जुलै सोमवार रोजी उरूस यात्रा होणार आहेत.
धार गांवापासून दोन किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या सुफी संत हजरत अब्दुल रज्जाक शहा पिरबाबा यांच्या उरूस दरवर्षी उत्साहात पार पडतो. या यात्रेसाठी मध्ये प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातील विविध भागातून हिंदू मुस्लिम भाविक श्रद्धेने येतात. उरूस यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी प्रवास करताना आरामशीर प्रवास करावा व वाहन सावकाश चालवावे असे आवाहन धार पिरबाबा येथील मुजावर पंच कमिटीतर्फे करण्यात आले आहे.