एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीचे आढावा बैठक संपन्न.

एरंडोल (प्रतिनिधि)जिल्हा अध्यक्ष प्रदीपराव पवार यांनी एरंडोल येथे शासकीय विश्रामगृहा मध्ये एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीचे आढावा बैठक.
त्यांच्या बैठकीनंतर एरंडोल काँग्रेस कमिटीत काही महत्त्वाचे संघटनात्मक फेरबदल करण्यात आले. राजेंद्र रामदास चौधरी यांची एरंडोल तालुका कार्यकारी अध्यक्ष व प्राध्यापक आर एस पाटील सर यांची एरंडोल शहराध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली या नेमणुकीच्या वेळेस प्रदेश प्रतिनिधी विजय पंढरीनाथ महाजन तसेच डॉक्टर फरहाज हुसेन बोहरी,
अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष कलीम शेख हुसेन
ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील,
जळगाव जिल्हा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, अयाज मुजावर शहर अध्यक्ष अल्प. सं , जब्बार शेख ता. उपाध्यक्ष अल्प. सं एरंडोल, शेख सांडू दादा
कैलास मोरे, शेख जाकीर, सय्यद अंजूम हाश्मी, भरत पाटील खर्ची, रवींद्र बळीराम पाटील,
या बैठकीत सर्वांनी मुळापासून पक्ष बांधणीवर चर्चा करण्यात आली व
ग्रामस्तरीय कमेट्या, शहरी भागात प्रभागस्तरीय कमेट्या
सर्व जिल्ह्यांमध्ये बुथ कमेट्या स्थापन करून त्या कार्यरत
लवकरात लवकर करणे. भविष्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना विधानसभेच्या व लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता वरील काँग्रेस पक्ष अधिक बळकट होण्यास मदत होईल यावेळेस जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी एरंडोल काँग्रेस कमिटी महत्त्वाचे फेरबदल करून कठोर निर्णय घेण्यात येतील असे संकेत दिले गेले.