आमदार फोडण्यासाठी निधीची खैरात. – बाळासाहेब थोरात

24 प्राईम न्यूज 25 Jul 2023. सरकारने ४१ हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या मंजुरीसाठी मांडल्या आहेत. त्यात आमदार फोडण्यासाठी आणि ज्यांना मंत्री करू शकत नाही, असे फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी त्यांच्यावर भरघोस निधीची खैरात केली आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केला. यामुळे आमदार आणि जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला असून सरकारने हा अन्याय दूर करावा, अन्यथान्यायालयात जावू, असा इशाराही थोरात यांनी यावेळी दिला.
विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत । सहभागी होताना बाळासाहेब थोरात यांनी निधीच्या असमान वाटपाची यादीच दाखवली. सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष झाले आहे. या एक वर्षात चार अधिवेशने 1 झाली. या काळात फक्त पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून १ लाख २० हजार कोटी रुपये वाटप केले जातात. राज्याच्या अर्थव्यवस्थे- साठी हे चांगले लक्षण नाही.’