एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री.. -पृथ्वीराज चव्हाण.

0

24 प्राईम न्यूज 25 Jul2 023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वापर पूर्ण झाला असून, त्यांची भाजपसाठी असलेली उपयुक्तता संपलेली आहे. एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या बाहेर आपला प्रभाव पाडू न शकल्याने त्याच्या नेतृत्वाखाली भाजप लोकसभेची निवडणूक लढवू शकणार नाही. विधानसभेत त्यांच्या पक्षांतराचा निर्णय होईल तेव्हा ते अपात्र ठरून मुख्यमंत्रिपद रिक्त होईल. या रिक्त जागी अजित पवारांना मुख्यमंत्री करून त्यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेची निवडणूक लढवली जाईल, असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
विधिमंडळाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी हा खळबळजनक दावा केला. भाजपच्या ज्येष्ठ नेतृत्वाला महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणूक महत्त्वाची आहे. ही निवडणूकच पंतप्रधान मोदी सत्तेत राहणार किंवा नाही हे ठरणार आहे. एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या बाहेर प्रभाव पाडू शकलेले नाहीत. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला लोकसभा निवडणुकीला सामोरे जाता येणार नाही. त्यामुळे आता अजित पवारांना सांभाळून घेतलेच आहे तर त्यांनाच जबाबदारी द्यावी, असा निर्णय झाला असल्याची माझी माहिती असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. एकनाथ शिंदेच्या पक्षांतराबाबतचा निर्णय १० ऑगस्टपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यावेळी ते अपात्र ठरतील आणि त्यांचे पद रिक्त होईल, कदाचित त्याच्याआधीही निर्णय होऊ शकतो, असे सांगतानाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी एकनाथ शिंदेच्या ऐवजी अजित पवार यांना मुख्यमंत्री केले जाईल. कारण लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची पक्षाला गरज आहे, असा दावा चव्हाण यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!