पालकमंत्री मा.श्री.गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री मा.श्री.गिरीषजी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक.

जळगांव (राहत खाटीक) जिल्ह्यात अतिवृष्टी ,मुसळधार पाऊस, नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणेबाबत पालकमंत्री मा.श्री.गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री मा.श्री.गिरीषजी महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपस्थित राहून रावेर मतदारसंघातील अतिवृष्टी मुळे शेतीचे व घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली तसेच जुना सावदा रोडवरील पुल मंजूर झाला असून त्याची उंची वाढवून काम लवकर पूर्णत्वास यावे तसेच बामणोद ते वनोली रोडवरील पूल उंच व संरक्षण भिंत व पुनखेडा ता. रावेर येथे जो नवीन पूल बांधला गेला आहे त्याला आजूबाजूला संरक्षण भिंत मंजूर करावी अशी मागणी पालकमंत्री यांच्याकडे केली.
यावेळी माझ्यासह पालकमंत्री मा.श्री.गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री मा.श्री.गिरीषजी महाजन, खासदार राक्षताई खडसे , आमदार श्री.मंगेश चव्हाण, आमदार आमदार श्री.चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी श्री.अमन मित्तल, पोलीस अधिक्षक श्री.एस.राजकुमार ई. प्रमुख उपस्थित होते.