रस्ते चार दिवसात दुरूस्त करावे अन्यथा म. न. से. तर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा…

एरंडोल ( प्रतिनिधि ) महाराष्ट्र नवनिर्माण सेना एरंडोल यांच्या वतीने एरंडोल नगर पालिका मुख्याधिकारी यांना कॉलनी परिसरातील अतिशय खराब झालेल्या रस्त्यांबाबत निवेदन देण्यात आले. या निवेदनात एरंडोल नगर पालिका हद्दीत येणाऱ्या सर्वच खराब रस्त्यांविषयी लवकर दुरुस्ती करावी असे सांगण्यात आले असून रस्त्यांमुळे लहान मुलांना शाळेत जाणे शक्य होत नाही , नागरिकांना या रस्त्यांवर पायी चालणं सुद्धा तारेवरची कसरत झालं आहे , तसेच एखाद्या रुग्णास हॉस्पिटलमध्ये नेणं ही शक्य होत नसून रुग्ण दगावण्याची दाट शक्यता आहे व जर रुग्णाचे काही बरेवाईट झाल्यास त्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार असेल. म्हणून सदर रस्त्यांची लवकरात लवकर म्हणजे पुढील चार दिवसात दुरुस्ती करावी , अन्यथा म.न.से. तर्फे सर्व नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल बागुल यांनी दिला आहे. तसेच निवेदनावर तालुकाध्यक्ष विशाल सोनार , सुदर्शन महाजन , गोकुळ पाटील , सुनिल महाजन , विजय महाजन , दौलत चौधरी , एकनाथ झांबरे , दीपक महाजन , ज्ञानेश्वर महाजन , नितीन महाजन , मीराबाई महाजन , उषाबाई भदाणे , जयश्री माळी , सतीश महाजन , शिवाजी माळी , ममता माळी , कृष्णा माळी , राकेश लोहार , भूषण महाजन , दिपक चौधरी , प्रथम चौधरी , सुनिल चौधरी , दिनेश बडगुजर , प्रवीण बडगुजर , सीताराम माळी , छोटू बेहेरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.