अनेक वेळी तक्रार करूनही नगरपालिकेचे दुर्लक्ष, -सर्वत्र घानीचे सम्राज्य, -नागरिक धडकले नगरपालिकेत.

अमळनेर (प्रतिनिधि)
अमलनेर प्रभाग क्र 5 जापान जिन परिसरात गेल्या अनेक वर्षा पासून रस्त्यांची व गटारींची दुरावस्था झालेली आहे तरी नागरिकांकडून अनेकदा तोंडी व लेखी निवेदन हि देण्यात आलेले आहे तरी आता पर्यन्त कुठलीच कार्यवाही झालेली नाही सध्या पावसाळा सुरू

आहे येथे रस्त्यावर चा पाणी निघायला गटारीच नाही ते पाणी रस्त्यावरच साचत आहे याच्या मुळे कुठल्या प्रकारचा आजार जर झाला तर याला जवाबदार नगरपरिषद राहणार तसेच रस्त्यावर सर्वाच ठिकाणी चिखल झालेला आहे येथून शाळेत जाणारे लहान लहान मुले व नमाज पठण करण्यासाठी जानारे वयवृद्ध लोकांचे हाल होत आहे तरी आपणास विनंती आहे कि त्वरित रस्ते व गटारी बनून द्यावे अन्यता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन देण्यात आले, यावेळी अजहर अली सैय्यद,इम्रान शेख, आसिफ अली,फारूक शेख, सैय्यद नबी, रीसालत आली,मोहसीन शेख, एजाज शेख,अझहर आली, मकसुद आली, व जापान जिन येथील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते..