धार येथील यात्रेतून मोटारसायकल लंपास.

अमळनेर( प्रतिनिधि)
अमळनेर तालुक्यातील धार येथील अब्दुल रज्जाक शाह बाबा यांच्या यात्रेतून एका भाविकांची २४ रोजी मोटारसायकल लंपास करण्यात आली असून,मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील तांबेपुरा, विप्रो कॉलनी भागातील रहिवाशी शेख मुक्तार शेख निजाम हे २४ रोजी दुपारी धार येथील यात्रेसाठी २० हजार रुपये किंमतीच्या स्प्लेंडर कंपनीच्या एम.एच.१९ सिटी ५७७५ या गाडीने गेले होते.शेख मुक्तार हे गाडी लावून यात्रेत गेले मात्र यात्रेतून परत आल्यावर लावलेल्या जागी मोटारसायकल दिसून आली नसल्याने मोटारसायकल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
मोटारसायकल चोरीप्रकरणी अज्ञाताविरुद्ध मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हे.कॉ.मुकेश साळुंखे करत आहेत.