जिल्हा स्तरीय सुब्रतो चषक शालेय फुटबॉल स्पर्धा.,
१४ वर्षा आतील गटात सेंट अलायसेस विजयी तर काशिनाथ पलोड उपविजयी..

जळगाव ( प्रतिनिधी )
१७ वर्षा आतील स्पर्धे साठी मुलांचे २६ संघाचा समावेश
श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुब्रदो चषक आंतर शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली होती.
१४ वर्षातील गटात १४ संघा मध्ये लढत होऊन अंतिम विजेता सेंट अलायसेस तर उपविजेता पलोड संघ ठरला.
विजयी व उपविजयी संघास गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर केतकी पाटील यांच्या शुभहस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी पाहुणे म्हणून जिल्हा संघटनेचे सचिव फारूक शेख, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, क्रीडा अधिकारी श्रीमती सुजाता गुल्हाणे, बेंडाळे महाविद्यालयाच्या क्रीडा संचालिका प्रोफेसर डॉक्टर अनिता कोल्हे व फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल यांची उपस्थिती होती.
उपांत्य व अंतिम फेरीचा निकाल
- काशिनाथ पलोड विजयी विरुद्ध अंजुमन हायस्कूल जामनेर भुसावळ १-०
- सेंट अलयसेस भुसावळ विजयी विरुद्ध ताप्ती स्कूल भुसावळ १-०
*सेंट अलायसेस भुसावळ विजयी विरुद्ध काशिनाथ पलोड १-०
१७ वर्षा आतील स्पर्धेला सुरवात
स्पर्धचे औपचारिक उद्घाटन डॉ केतकी पाटील यांनी फुटबॉल ला किक मारून केली.

यात एकूण २६ संघाचा समावेश असून मंगळवारी या स्पर्धेचे नाणे फेक पोलीस दलाचे फुटबॉल चे राष्ट्रीय खेळाडू व संघटनेचे संचालक मनोज सुरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी आज बक्षिसे सुद्धा दिली.
१७ वर्षा आतील मुलींच्या स्पर्धा गुरुवारी होतील.
शुक्रवार पासून मनपा च्या स्पर्धा होतील याची नोंद घ्यावी असे क्रीडा अधिकारी सुजाता गुल्हाने व सचिव फारुक शेख यांनी केले.