“शासकीय काम बारा महिने थांब”
एरंडोल भुमिअभिलेख कार्यालयाचा आळसाचा कहर..

0


एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल तालुका भूमि अभिलेख कार्यालयाचा आज दिनांक २६ जुलै २०२३ रोजी आळसाचा कहर झाल्याचा प्रत्यय उपस्थित जनतेला व प्रसिद्धी माध्यमांना दिसून आल्याची घटना एरंडोल येथे घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की एरंडोल भुमी लेख कार्यालयात नेहमी लोकांची कामे वेळेवर होत नाही त्यामुळे अनेकांना मनस्ताप होऊन भांडणे देखील झाल्याचे आतापर्यंत घडले आहे तसेच त्यांच्या या कारभाराची अनेकांनी अनेक वेळेस जिल्हा पातळीवर सुद्धा तक्रारी केल्या असून जिल्हा पातळीवरून सुद्धा त्यांना जिल्हा भूमी अभिलेख यांच्याकडून वारंवार सूचना देऊन ताकीद देण्यात आली आहे एवढे असतानाही सदर कार्यालयात कुठल्याही प्रकारचा सुधारणा दिसून येत नसल्याचे आजच्या घटनेने दिसून आले. एरंडोल येथील मन्साराम खुशाल महाजन यांचे दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी वाटणीपत्राप्रमाणे घरावर नाव लावणे कामी अर्ज दाखल केला होता. दरम्यान मन्साराम महाजन यांनी रितसर २१ दिवसानंतर कार्यालयात मागणी पत्र घेण्यासाठी गेले असता त्यांना तब्बल दिड वर्षापर्यंत संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच आठ दिवसापूर्वी सदर प्रकरण मन्साराम महाजन यांना दाखवले व लवकर तुमचे प्रकरण करून देऊ अशी ग्वाही दिली त्यानंतर दिनांक २७ जुलै २०२३ रोजी मन्साराम महाजन व त्यांच्या पुत्र पांडुरंग महाजन , धनराज महाजन आदी कार्यालयात आपल्या मालमत्ता पत्र घेण्यासाठी गेले असता त्यांना सदर अर्ज गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. त्या ठिकाणी महाजन यांनी संबंधितांना हे काम आमचे नाही असे उत्तर दिले त्यामुळे त्या ठिकाणी काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली त्यातच मन्साराम महाजन यांचे मुलं यांनी स्वतः कार्यालयात सदर प्रकरणाचा अर्ज शोधून सदर कर्मचाऱ्यांना दिला यावरून भूमिलेख भूमी अभिलेख कार्यालयाची प्रश्नचिन्ह निर्माण होत असून उपस्थितांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे तसेच भूमी अभिलेख कार्यालयाच्या आळशीपणाबद्दल प्रत्येकाच्या मनात राग निर्माण होत होता प्रत्यक्षदर्शी यांच्या म्हणण्यानुसार आज त्या ठिकाणी काही लोकांनी आत्मदहन करण्याचा सुद्धा इशारा दिला असल्याचे बोलले जात आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा देशी स्थापना व कामचूकारपणाचे दर्शन झाले तरी वरिष्ठांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी जोर धरत असून आता तरी कारवाई ही पूर्ण व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.
कोट – जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता साहेबांनी आम्हाला सोमवार दि. १ ऑगस्ट २०२३ पर्यंत तुमचं काम होऊन जाईल अशा आश्वासन दिले आहे. अर्जदार :- मन्साराम महाजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!