मणिपूर घटनेचा अमळनेर महाविकास आघाडी तर्फे प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा. -केंद्र सरकारच्या विरोधात महा विकास आघाडी तर्फे जोरदार घोषणाबाजी.

अमळनेर ( प्रतिनिधि )
मणिपूर येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून पीडित महिलांना न्याय मिळावा या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी यांना देणयात आले

शहरातील महाराणा प्रताप चौकात केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.देशातील महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटना रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.महाराणा प्रताप चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रांताधिकारी यांना केंद्र सरकारच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले.
निवेदनावर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील,शहराध्यक्ष शाम पाटील,काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे,शिवसेना (उबाठा) तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील,काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ,मार्केट उपसभापती सुरेश पिरन पाटील,संचालक प्रा.सुभाष पाटील,ग्रंथालय विभागाचे उमेश पाटील, नगरसेवक प्रताप शिंपी,नरेंद्र संदानशिव,संदीप घोरपडे,मुन्ना शर्मा,जयवंतराव पाटील,विजय पाटील,संभाजी पाटील,धनगर दला पाटील,सचिन वाघ,गजेंद्र साळुंखे,कैलास पाटील,मनीषा परब,उज्वला कदम,कल्पना वानखेडे, रियाज मौलाना,अँड.रज्जाक शेख,गोविंदा सोनवणे,संजय चव्हाण,कुणाल चौधरी,पी.वाय पाटील तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.