दर्डा पिता-पुत्रांना ४ वर्षांची शिक्षा
कोळसा घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या विशेष कोर्टाचा निर्णय..

24 प्राईम न्यूज 27 Jul 2023
कोळसा घोटाळाप्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयानेन्यायालयाने कोळसा घोटाळाप्रकरणी कलम १२० ब ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले. दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टाने दोषींना १५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणातीलच आणखी एक दोषी संचालक मनोज कुमार जैस्वाल यांनाही १५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता यांना ३ वर्षांच्या शिक्षेसह १०,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयने दोषींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा व १५ लाखांचा दंड सुनावला आहे. १३ जुलैला विशेष न्यायालयाने या प्रकरणात त्यांना दोषी ठरवले होते. याप्रकरणी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक यांनाही ४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याच प्रकरणात न्यायालयाने माजी कोळसा सचिव एच.सी.
गुप्ता, दोन वरिष्ठ नागरी सेवक के. एस. क्रोफा आणि के. सी. समरिया यांना ३ वर्षांची शिक्षा सुनावली आहे..