नवीन जिल्हाधिकारी यांची सदिच्छा भेट व अल्पसंख्याकाचे प्रश्नावर सकारात्मक चर्चा..

जळगाव ( प्रतिनिधी ) जळगाव जिल्हा अधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील आयुश प्रसाद यांनी जिल्ह्याचा कार्यभार हाती घेतल्यावर मुस्लिम समाजातील काही राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिष्टमंडळाने जिल्हाधिका
री यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना इस्लामिक मराठी पुस्तके, शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या सदिच्छा भेटीत जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाचे काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली.

चर्चेतील लेखी मुद्दे
१) जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात खास करून शासकीय जिल्हा परिषद ,नगरपालिका व महानगरपालिका अंतर्गत सुरू असलेल्या शाळांमध्ये शिक्षक व वर्ग खोल्या कमी आहे
२)अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळात सुमारे एक वर्षापासून कोणत्याही प्रकारचा कर्ज पुरवठा मिळत नाही.
३) जिल्ह्यातील उर्दू घर स्थापने साठी आवश्यक तो पाठ पुरावा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात यावा
४) जळगाव शहरात महानगरपालिका अथवा शासनाची दफनभूमी (कब्रस्तान) नाही.परंतु शहराची संख्या वाढत असल्याने त्वरित दफन भूमी उपलब्ध करून मिळावी.
५)काही समाजकंटक अनधिकृत प्रार्थना स्थळाची शासनाच्या खास करून मनपाच्या भूखंडावर उभारणी करत असून संबंधित यंत्रणाकडे तक्रार करून सुद्धा काही एक कारवाई होत नसल्या ने भविष्यात मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याबाबत जिल्हा दंडाधिकारी यांनी त्वरित योग्य ती पावले उचलावीत.
६) पंतप्रधान 15 कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात यावी.
७) शासकीय व निमशासकीय समित्यांमध्ये अल्पसंख्यांक समाजाच्या पुरुष व महिलांना स्थान देण्यात यावे.खास करून सी डब्ल्यू सी (बाल कल्याण समिती) व महिला सुरक्षा समित्या मध्ये.
८) भविष्यात अकस्मात पणे उद्भवणाऱ्या अडीअडचणीवर त्वरित प्रशासकीय तोडगा काढण्यात यावा व अल्पसंख्यांक समाजाला न्याय मिळवून द्यावा.
लेखी मुद्दे बाबत चर्चा व कार्यवाही चे आश्वासन
प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करून तो विषय समजून घेऊन कोणत्या विभागाकडे तो विषय आहे त्या विभाग प्रमुखांशी बोलून किवा अहवाल मागून त्वरित योग्य ती सकारात्मक कार्यवाही केली जाईल असे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले.
शिष्ट मंडळात यांचा होता समावेश
कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद,मनियार बीरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, अल्पसंख्यांक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मझहर पठाण, हुसेनी सेना चे अध्यक्ष फिरोज शेख, युवक काँग्रेस महाराष्ट्राचे सचिव बाबा देशमुख, एम आय एम चे जिल्हाध्यक्ष अहमद सर, वहीदत ए इस्लामीचे डॉक्टर जावेद शेख, शिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान,
शिवसेना ठाकरे गट महानगर अध्यक्ष जाकिर पठाण, मुस्लिम ईदगाह ट्रस्टचे अनिस शहा, नगरसेवक प्रतिनिधी अक्रम देशमुख, जुना मेहरून चे प्रमुख कासिम हाफिज, बेलदार बिरादरी चे नुरखान बेलदार, नशिराबाद सामाजिक संस्थेचे कासार फजल, आदींचा समावेश होता.