“रक्षक बनला भक्षक”.
एरंडोल तालुक्यातील वसतिगृहात पाच मुलींचे केले काळजी वाहकाने लैंगिक शोषण.

समुपदेशना दरम्यान उघडकीस आला प्रकार.
एरंडोल (प्रतिनिधी ) एरंडोल तालुक्यातील खडके बू .येथील मुलींच्या बालगृहात पाच मुलींचे लैंगिक शोषण करण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. हा प्रकार मुलींच्या बालगृहात मुलींचे रक्षण करणार्यांनेच केल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून त्याला याप्रकरणी साथ देणाऱ्या त्याची पत्नी आणि सचिव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान पीडित मुलींची जळगावच्या रिमांड होम मध्ये रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान याबाबत मिळालेली माहिती अशी की एरंडोल तालुक्यातील खडके बु.येथे मुलींचे बालगृह आहे.या बालगृहाला शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने संस्थेकडून नोव्हेंबर २०२२ पासुन ते बंद करण्यात बाबत पत्र व्यवहार करण्यात येत होता.त्याअनुषंगाने बाल कल्याण समिती जळगाव यांनी चौकशी केली असता या बालगृहात १९ अल्पवयीन मुली होत्या यातील ८ पालक असलेल्या मुलींना त्यांच्या पालकांसोबत पाठवण्यात आले.त्यातील ११ प्रवेशित बलिकांना दि .२३ जुलै २०२३ रोजी बाल कल्याण समिती जळगाव यांच्या आदेशान्वये जळगाव येथील मुलींच्या बालगृहात तात्पुरत्या स्वरूपात दाखल करण्यात आले होते.यातील बलिकांचे समुपदेशन करतांना पाच बालिकांवर गणेश शिवाजी पंडित या काळजी वाहकाने अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच याप्रकरणी वस्तीगृहातील त्याची अधीक्षिका पत्नी अरुणा गणेश पंडित आणि सचिव भिवाजी दीपचंद पाटील (रा. तळई ता. एरंडोल) यांना देखील माहित झाले होते. मात्र त्यांनीही या प्रकाराकडे दुर्लक्ष केले असल्याचे चौकशी दरम्यान कळले आहे.
सदर पाचही मुलींवर ऑगस्ट २०२२ ते जून २०२३ या काळात अत्याचार करण्यात आला असून पाच बालिका तेथील वसतीगृहात राहत होत्या.पाचही बालिकांशी उपरोक्त काळात वेळोवेळी लैंगीक छळवणूक करुन अनैसर्गिक संभोग देखील केलेला असल्याचे उघड झाले आहे.दरम्यान घटनेचे गांभीर्य पाहता संशयित आरोपी गणेश पंडीत यांची अधीक्षिका पत्नी अरुणा गणेश पंडित आणि सचिव भिवाजी दीपचंद पाटील (रा. तळई ता. एरंडोल) यांनी त्यांचे कर्तव्य पालन न करता गणेश पंडित याला मदत करीत सदरची माहीती लपवुन ठेवली. या प्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनचे पीएसआय शरद बागल यांच्या फिर्यादीवरून गणेश शिवाजी पंडीत, सचिव भिवाजी दीपचंद पाटील यांच्यासह अधीक्षक महिला अरुणा पंडित यांची विरुद्ध भा.द.वि.क. ३५४, ३७६ (२) (ड) (एन) (क), ३७७, POCSO कलम ३,४,५, ६,८,९,१०,१२, १९, २१, सह अनुसुचीत जाती व जमाती कायदा कलम ३ (१) (अ) (ई) (व्ही) (डब्ल्यू) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यत आला आहे.