अमळनेर शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रूगणांना फळे वाटप.

अमळनेर ( प्रतिनिधि) शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेनेतर्फे अमळनेर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. नुकत्याच इरशाळवाडी येथे झालेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचा वाढदिवसचा कोणताही सोहळा साजरा न करता सामाजिक उपक्रमाद्वारे जनतेची सेवा करून साजरा करावा अशा आशयाची सूचना शिवसैनिकांना केली होती. त्याच पार्श्वभूमीवरअमळनेर तालुका शिवसेना-युवासेना तर्फे अमळनेर ग्रामीण रुग्णालयात फळे बिस्किट रूग्णांना वाटण्यात आले या वेळी शिवसैनिक शशिकांत अंबर पाटील, साहेबराव वसंत पवार, माजी नगरसेवक प्रताप शिंपी, माजी नगरसेवक गोरख पाटील, उमेश अंधारे, निळू सुभाष, पाटील,विजु मास्टर,नितीन भाऊ,शेखर भावसार, शिंगणे, जीवन पवार , आदी कार्यकर्ते उपस्थित होते.