सुब्रतो फुटबॉल स्पर्धा – मुलांमध्ये बियाणी तर मुलींमध्ये ताप्ती भुसावळ विजयी व दोन्ही गटात रुस्तमजी उप विजयी..

जळगाव ( प्रतिनिधि )
आंतर शालेय सुब्रतो मुखर्जी १७ वर्षा आतील मुले आणि मुलींच्या स्पर्धा क्रीडा संकुल येथे तीन दिवसापासून सुरू होत्या त्या स्पर्धेचा समारोप गुरुवारी झाला असून मुलांच्या गटात बियाणी पब्लिक भुसावळ विजेते तर रुस्तमजी इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव उपविजेते ठरले तर मुलींच्या गटात ताप्ती भुसावळ विजयी तर
रुस्तमजी जळगाव उपविजेयी ठरली.
विजेते व उपविजेते संघास भास्कर पाटील, मनोज सुरवाडे व स्पोर्ट्स हाऊस आमीर शेख यांचे तर्फे चषक देऊन गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभ
पारितोषिक वितरण समारंभाला जळगाव शहर महानगर पालिकेच्या उपायुक्त अश्विनी गायकवाड, फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख, सहसचिव डॉक्टर अनिता कोल्हे व अब्दुल मोहसीन, क्रीडा अधिकारी सौ सुजाता गुल्हाने, पोलीस दलाचे फुटबॉलचे राष्ट्रीय खेळाडू भास्कर पाटील व मनोज सुरवाडे यांची उपस्थिती होती.
सामन्या अंतिम निकाल खालील प्रमाणे मुले
१) अनुभूती विजय विरुद्ध सेंट अलायसेस भुसावळ १-०
२) शानबाग विजय विरुद्ध अंजुमन जामनेर २-१
उपांत्य फेरी सामना
१) बियाणी पब्लिक विजयी विरुद्ध अनुभूती २-०
२) रुस्तमजी विजय विरुद्ध शानबाग १-०
अंतिम सामना
बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ विजय विरुद्ध रुस्तमजी स्कूल जळगाव ३-०
मुली
१)बियाणी पब्लिक विजय विरुद्ध एन के नारखेडे भुसावळ २-०
२)रुस्तमजी विजय विरुद्ध सेंट एलआयसेस भुसावळ पेनल्टी ११-११ विजयी नाणेफेक द्वारे घोषित
३) ताप्ती भुसावळ विजय विरुद्ध बियाणी मिलिटरी भुसावळ ३-०
४) रुस्तमजी विजय विरुद्ध डॉक्टर उल्हास पाटील भुसावळ १-०
अंतिम सामना
ताप्ती भुसावळ विजय विरुद्ध रुस्तमजी ३-१ पेनल्टी द्वारे
पारितोषिक वितरण समारंभास अश्विनी गायकवाड , डॉक्टर अनिता कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचा आढावा संघटना सचिव फारुक शेख यांनी सादर केला.
सूत्रसंचालन अब्दुल मोहसीन यांनी तर आभार प्रदर्शन सुजाता गुल्हाने यांनी केले.