समान नागरी कायदा विरोधात जळगाव – भुसावळ येथून १लाख ६०हजार पत्र रवाना..

जळगाव ( प्रतिनिधी)
जळगाव जिल्ह्यातून ५१ हजार सर्वात जास्त पत्र
विधी आयोग गृह मंत्रालय भारत सरकारने समान नागरी कायद्यासाठी भारताच्या नागरिकांकडून सूचना मागविल्या होत्या व त्याची अंतिम मुदत २८ जुलै ही होती. २७ जुलै रोजी भुसावळ वरून दिल्ली येथे अनिस कीफायत उर्फ अन्नू भाई यांच्यासह अश्रफ खाटीक व रफिक मसालेवाले यांच्यासोबत १लाख ६० हजार २६० पत्र देऊन त्यांना दिल्लीसाठी रवाना करण्यात आले.
या समितीला शुभेच्छा व दुवा देण्यासाठी जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फा

रुख शेख, कारी जहीर, मौलाना नूर मोहम्मद, अनिस शाह, अन्वर खान व मुजाहिद खान यांची उपस्थिती होती.
जळगाव येथून मिळाली प्रेरणा- कारी जहीर
१४ जुलै अंतिम तारीख असताना जळगाव येथून सर्वात जास्त २४८९० पत्र लॉ कमिशनला मिळाली होती व ती सर्वात जास्त असल्याचे घोषित करण्यात आले होते.
मौलाना मोहम्मद उमरेन महफूज रहमानी, सेक्रेटरी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मालेगाव यांच्या आवहना नुसार मौलाना नूर मोहम्मद
सदर जमीअत उलमा (महमूद मदनी),कारी जहीरउद्दीन,
कन्वीनर इस्लाही माअशेरा कमेटी मुस्लिम पर्सनल ला बोर्ड, भुसावळ व फारुक शेख यांच्या नेतृत्वात पुनश्च पत्र जमा करण्यात आले असता जळगाव जिल्ह्यातून सुमारे २६५६० पत्र जमा करण्यात आली व पूर्वीची २४८९० अशी एकूण ५१ हजार ४५० पत्र देण्याचा उच्चांक जळगाव जिल्ह्याने नोंदविला आहे.
त्यासोबत धुळे येथील जमियत उलमा (अरशद मदनीचे) उपाध्यक्ष मोहम्मद शव्वाल यांनी सुद्धा ४० हजार पत्र जमा करून मुस्ताक सुफी, मोईन मेकॅनिक व मोहम्मद अजगर अली यांच्या हस्ते बाय रोडने रवाना केले.
जळगाव -भुसावळ सेंटर ला पत्र जमा करण्यासाठी कार्यरत महनीय व्यक्तिमत्व
*मालेगाव ५०हजार(मौलाना उमरेन)
*धुळे ८०००(मुफ्ती कासिम)
*जळगाव २६५६०(यात जळगाव शहर, पहूर, चाळीसगाव, रावेर, मुक्ताई नगर,नशिराबाद,) (फारुक शेख व इतर)
- भुसावळ ९४६०(कारी जहीर व मौलाना नूर मोहम्मद)
*सिल्लोड २२००(मुफ्ती अझहर)
*बीड २१५०(अकील भाई)
*मुर्ताझापुर ८५०(हाफिज कौसर)
*खामगाव ४५००(मुफ्ती रफिक)
*नागपूर ४५००(मुफ्ती अतिक,कामठी)
अशा प्रकारे पूर्वी २४८९० व धुळे येथून कार ने ४०००० अशी एकूण १६७८९० पत्र सादर करण्यात आले.