मणिपूरमधील महिलांचे धिंड प्रकरण सीबीआयकडे…

24 प्राईम न्यूज 28 Jul 2023
- मणिपूरमधील २ महिलांची धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय गुन्हे अन्वेषणकडे (सीबीआय) सोपवला आहे. यासोबतच केंद्र सरकार या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रही दाखल करून व्हायरल व्हिडीओची सुनावणी मणिपूरबाहेर घेण्याची विनंती करणार असल्याचे म्हटले जात आहे.
मणिपूरमध्ये २ महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ४ मे २०२३ रोजी घडला, परंतु १९ जुलै रोजी हा व्हायरल व्हिडीओ समोर आला. जुलै महिना अर्धा उलटूनही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नव्हती. या घटनेचा व्हिडीओ जनतेसमोर आल्यानंतर त्याचे गंभीर पडसाद उमटले. आठवडाभरात या प्रकरणी ७ आरोपींना अटक झाली आहे.