महिलेच्या गळ्यातून १८ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने केली लंपास..

अमळनेर ( प्रतिनिधि ) मंगळग्रह मंदिरावर दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातून १८ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २५ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
नारायण खोडके व जयश्री खोडके हे दाम्पत्य २५ रोजी मंगळग्रह मंदिरावर दर्शनासाठी गेले होते. चोरट्याने १० ग्राम वजनाची सोन्याची चेन चोरून नेली. अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.