RO वॉटर फिल्टर चे उद्घाटन श्री.सतीश पाटील व सौ.योगिता सतीश पाटील यांचे हस्ते..

24 प्राईम न्यूज 29 Jul चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव येथे दि.28/7/2023 रोजी मा.श्री रामदास वाकोडे साहेब, पोलीस निरीक्षक (पारोळा पोलीस स्टेशन),मा.वाकोडे साहेबांनी मा.श्री.सतीश, श्री पाटील मा.सरपंच कंकराज,ता.पारोळा व सौ.योगीता सतिश पाटील ह.मु.ठाणे यांच्यामार्फत आमच्या विशेष विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याचे रू.12000/- किंमतीचे RO वॉटर फिल्टर मिळवून दिले. उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार संस्थेचे अध्यक्ष.श्री योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या हस्ते करण्यात आला. RO वॉटर फिल्टर चे उद्घाटन श्री.सतीश पाटील व सौ.योगिता सतीश पाटील यांचे हस्ते करण्यात आले.तसेच श्री रामदास वाकोडे साहेब.पो.नि.,श्री सतीश पाटील व सौ योगिता सतीश पाटील यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री. योगेश रघुनाथ महाजन सर अध्यक्ष परिश्रम दिव्यांग मुला-मुलींची निवासी शाळा पारोळा तसेच श्री.महेंद्र मराठे साहेब पो.कॉ,श्री.सुधीर चौधरी साहेब पो.कॉ, हे उपस्थित होते. श्री.वाकोडे साहेब व श्री.सतीश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले व श्री.योगेश रघुनाथ महाजन सर यांच्या दिव्यांग सेवेबद्दल भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.जगदीश सोनवणे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.हेमंत महाजन सर यांनी केले.या कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.