जनता बियर बार वर सुलतान, शाहरुख चा राडा, गुन्हा दाखल.

0

अमळनेर ( प्रतिनिधि) जनता बियर बार येथे दारू प्यायला गेलेल्या सुलतान व शाहरुख या दोन्ही भावांनी शहरातील जनता बियर बार वर राडा घालत दुकानाचे नुकसान करून मालकाचे पैसे काढून नेल्याची घटना १० रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शहरातील बाजारपेठेत असलेल्या जनता बियर बार वर सुलतान रहिमखा पठाण (रा. शाहआलम नगर) याने दारूची बाटली मागितली. त्यावर मालकाने तू येथे दारू पिऊ नको, पिल्यावर तू पैसे देत नाही आणि काचेचे ग्लास फोडून नुकसान करतो. याचा राग येऊन सुलतान ने शिवीगाळ आणि दमदाटी केली. लागलीच त्याचा भाऊ शाहरुख रहिमखान पठाण याला फोन लावून बोलावून घेतले. दोघं भावानी मालकाच्या तोंडावर, छातीवर लाथा बुक्यांनी मारहाण केली. नंतर सुलतानने मालकाचा गळा दाबून तोंडावर बुक्का मारला. त्यात त्यांचा चष्मा तुटला. त्याच्या खिश्यातून पैसे काढून घेतले. हातातील कडे काढून त्याचे तुकडे करून ते स्वतःच्या खिश्यात घातले. भांडण आवरण्यास आलेल्या आजूबाजूच्या दुकानदारांना देखील दमबाजी केली. मालकाच्या फिर्यादीवरून दोन्ही भावांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपा करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!