लक्ष्मीबाई पाटील यांचे दुःखद निधन..

अमळनेर ( प्रतिनिधि ) येथील ढेकू रोडवरील गुलमोहर कॉलनी मधील रहिवासी लक्ष्मीबाई संतोष पाटील (वाघ) वय-82 यांचे दि.10 रोजी संध्याकाळी 7.35 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात 2 मुलं, सुना, नातवंडे असा मोठा परीवार असून त्या अर्बन बँकेचे प्रदीप पाटील व पुणे येथील विनोद पाटील यांच्या मातोश्री होत्या.