डॉक्टरांवर हात उचलताना सावधान !

0

24 प्राईम न्यूज 12 Aug 2023

देशाच्या विविध भागात डॉक्टरांवर मारहाणीच्या घटना घडत असतात. त्यातून डॉक्टरांना संरक्षण देणारे कायदेही अस्तित्वात आले आहेत. ते कायदे अपुरे पडत आहेत. त्यामुळे मारकुट्या रुग्णांना थेट उपचारास नकार देण्याची नियमावली डॉक्टरांच्या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी संस्थेने सादर केली आहे.

डॉक्टरांविरोधात मारहाणीच्या घटना वाढत आहेत. त्या रोखण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरत आहे. तसेच रुग्णांप्रति आपले कर्तव्यही डॉक्टरांना बजावायचे आहे. तो आपल्या उपचारांबाबत उत्तरदायी असेल. त्यासाठी तो योग्य ते शुल्कही आकारू शकतो, असे ते म्हणाले.

मारपीट करणाऱ्या रुग्ण व त्याच्या नातेवाईकांची माहिती डॉक्टर लिखीत स्वरूपात सादर करू शकतात. तसेच ते रुग्णावर उपचार करण्यास नकारही देऊ शकतात. या रुग्णांना दुसरीकडे उपचारांसाठी पाठवले जाऊ शकते.

हे सर्व नियम भारतीय वैद्यकीय परिषदेच्या वैद्यकीय नैतिकता नियम २००२ ची जागा घेतील. हिंसक रुग्णांवर उपचार न करणे हा डॉक्टरांचा अधिकार असेल.

डॉक्टरने कोणाला सेवा द्यायची, याच्या निवडीचा अधिकार त्याला असेल. एखाद्या रुग्णावर उपचार करायला सुरुवात केल्यास डॉक्टरने त्याची उपेक्षा करू नये. ज्या रुग्णावर उपचार करत असेल, त्याची जबाबदारी डॉक्टरवर असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!