देशात शरद पवार यांच्या उंचीचा नेता कोणीही नाही. -शरद पवारांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही. -वळसे-पाटील यांची खंत.

24 प्राईम न्यूज 21 Aug 2023 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार यांचे मानसपुत्र समजले जाणारे व सध्या अजित पवार गटात गेलेले दिलीप वळसे- पाटील यांनी आज पहिल्यांदाच शरद पवार यांच्यावर भाष्य केले. शरद पवारांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
खासगी सचिव ते राज्याचे मंत्री असा दिलीप वळसे-पाटील यांचा प्रवास शरद पवार यांच्या आशीर्वादानेच झाला. परंतु काही दिवसांपूर्वी तेसुद्धा अजित पवार यांच्याबरोबर सरकारला स्वाधीन झाले. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत होते..
आज वळसे-पाटील बोलताना म्हणाले की, आपल्याकडे शरद पवारांसारखे उत्तुंग नेते असताना फक्त ६० ते ७० आमदार निवडून येतात. पण महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार यांना बहुमत दिले नाही. शरद पवार यांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री होता आले नाही. अनेक प्रादेशिक पक्ष पुढे जात आहेत. ममता बॅनर्जी, मायावती स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या.