अजित पवार आणि आमचे मतभेद आहे.परंतु आमच्यात मनभेद नाही. -संजय राऊत यांचे वक्तव्य बाळबोध आहे. खा. सुप्रिया सुळे.

24 प्राईम न्यूज 21 Aug 2023 राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, शरद पवार यांनी अनेक संस्था उभारल्या आहेत. त्यामधील अनेक संस्थांवर – अजित पवार आहेत. यामुळे या संस्थांचे पुढे काय करायचे त्यावर चर्चेसाठी शरद पवार आणि अजित 1 पवार यांच्यात बैठक झाली. या संस्थांमधून अजित पवार यांनी बाहेर पडावे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेत 1 अजित पवार यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
आम्ही नाती नेहमी जपली
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, – अजित पवार आणि आमचे राजकीय मतभेद आहे. परंतु आमच्यात मनभेद नाही. अजितदादांवर केलेल्या अशाटीकेबद्दल मला हसू येते. हे सर्व बाळबोध आहे. या सर्व संस्थांच्या काय करायचे ते आम्ही ठरवू. आम्ही नाती नेहमी जपली आहेत. घरातील नातीतर सोडा आज देशात अनेक ठिकाणी आमची नाती तयार झाली आहेत. माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार झाले आहे, पवार कुटुंबियांचे संस्कार आहे. यामुळे आम्ही सर्वांशी प्रेमाने बोलणार आहे, संजय राऊत यांचे वक्तव्य हे बाळबोध आहे.