काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती हा माझ्यासाठी मोठा सन्मानः -अशोक चव्हाण.

24 प्राईम न्यूज 21 Aug 2023 अशोक चव्हाण यांना कार्यकारिणी सदस्य म्हणून घेण्यातआहे. अशोक चव्हाण यांनीही यासंदर्भात ट्विट करुन पक्ष नेतृत्त्वाचे आभार मानले आहेत.
अशोक चव्हाण हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. मात्र, आपण कुठेही जाणार नाही, मी काँग्रेसमध्येच आहे, असणार असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर, अजित पवारयांनी भाजपासोबत जाऊन सत्तेत सहभाग घेतला. त्यामुळे, या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.
आता, काँग्रेसकडून अशोक चव्हाण यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये महाराष्ट्रातून एकमेव अशोक चव्हाण यांना स्थान देण्यात आलं आहे. हा माझ्यासाठीमोठा सन्मान असून मी या सेवेसाठी आभारी असल्याचं अशोक चव्हाण यांनी निवडीनंतर ट्रिटरवरुन प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.