आरोप करू नका, चौकशी करा – शरद पवार.

24 प्राईम न्यूज 31 Aug 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथे झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा भ्रष्टाचारी पक्ष असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यावर शरद पवार म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केवळ आरोप करू नयेत. राज्य सहकारी बँक व जलसंपदा घोटाळा, याची सखोल चौकशी करावी. सत्तेचा गैरवापर झाला असेल तर त्यांनी देशातील जनतेला सांगावे, असे आव्हान दिले.
“आघाडीच्या दोन दिवसात महत्वाची चर्चा होणार आहे. अन्य राजकीय पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी काही नेत्यावर टाकण्यात येईल. किमान समान कार्यक्रम तयार करण्यात येईल,” असेही शरद पवार म्हणाले.