उद्धव ठाकरे यांचा पुन्हा पंतप्रधान मोदींवर निशाणा..

0

24 प्राईम न्यूज 2 Sep 2023 उद्धव ठाकरे म्हणाले, “विरोधी पक्ष म्हणून आम्हाला संबोधले जात आहे. मात्र, आम्ही विरोधक नसून इंडिया म्हणजेच भारत आहोत. भारताचा झेंडा हातात घेतला आहे. देशाच्या विरोधात खरे कोण आहेत, ते देशवासीयांना माहीत आहे, अशी टीका करत भाजप देशविरोधी कारवाया करत असल्याचा थेट आरोपच उद्भव ठाकरेंनी केला’सबका साथ सबका विकास नाही, तर सबको लाथ मित्र का विकास’ असा प्रकार सध्या देशात सुरू आहे. जुमलेबाज हुकूमशहा उदयास आला असून त्याला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडी सज्ज आहे, अशा तिखट शब्दांत ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला ‘दहा वर्षे लूट आणि निवडणुकीच्या तोंडावर सूट’ हा जुमला आहे. अशा जुमलेबाजांना घरी बसवायचे आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एका जुमलेबाज, भ्रष्टाचारी आणि हुकूमशहाचा पराजय करायचा आहे, असे सांगत यापुढे ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ असा नारा देत जनतेची लढाई आम्ही जिंकणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!