शास्त्री फार्मसीत गणरायाचे जल्लोषात विसर्जन.

एरंडोल ( कुंदन ठाकुर)शनिवार रोजी शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी, पळासदळ, एरंडोल जि. जळगाव या महाविदयालयात गणरायाचे पाचव्या दिवशी जल्लोषात विसर्जन करण्यात आले.
सालाबादाप्रमाणे १९ तारखेला गणेश चतुर्थी च्या दिवशी गणरायाचे वाद्यवृंदाच्या सुरात वाजत गाजत आगमन झाले. सलग पाच दिवस विविध कार्यक्रम व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. चौथ्या दिवशी ९४.५ माय एफ एम चे आर. जे. देवा व सहकारी यांनी महाविद्यालयाला भेट दिली, विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला व मूषक मेसेंजर नावाचा उपक्रम घेतला, आयोजित केलेल्या स्पर्धामध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांंना भरपूर बक्षीसही देण्यात आले.
पाचव्या दिवशी संध्याकाळी गणेशाची विसर्जन आरती महाविद्यालयाचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री व संस्थेच्या सचिव सौ . रूपा शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले, त्यांच्या सोबत सौ. व श्री. नितीन बिर्ला, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील चौधरी, रोटरी स्टार्सचे अध्यक्ष श्री. धनराज कासट व इतर उपस्थित होते.
या निमित्ताने महाविद्यालयात सत्यनारायण महापूजा व भंडारा-सहभोजन आयोजित केला होता या प्रसंगी सर्वानी महाप्रसादाचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांकडून लेझीम रॅली ने मिरवणूकीची शोभा अजून वाढविली. पारंपरिक लेझीम रॅली साधारण ६० विद्यार्थी विद्यार्थिनींनी भगवे कपडे आणि भगवे फेटे घालून काढली.
यासाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी मान्यता दिल्या बद्दल डॉ पराग कुलकर्णी यांनी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले. गणेशोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, प्रा. राहुल बोरसे, इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे अनमोल सहकार्य लाभले असे श्री. शेखर बुंदेले यांनी कळविले आहे.