उत्कृष्ट गणेश मंडळांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार.
-संवेदनशील भागात सीसीटीव्हीचीही राहणार नजर.

अमळनेर (प्रतिनिधि)तालुक्यात १९४ सार्वजनिक व खाजगी गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. त्यापैकी २१ ठिकाणी एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आले आहेत.
अमळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत १५७ गणेश मंडळे आहेत. त्यात ७ खाजगी , ७ एक गाव एक गणपती व उर्वरित १४३ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. पाचव्या दिवशी ७ गणपती मंडळाचे विसर्जन झाले. सहाव्या दिवशी १ , सातव्या दिवशी १२ , ८ व्या दिवशी १६ , नवव्या दिवशी ५० आणि अनंत चतुर्दशीला ७२ गणेश मंडळाचे विसर्जन होणार आहे.
अमळनेर पोलीस स्टेशन अंतर्गत १३ उपद्रवी मंडळ , संवेदनशील व संमिश्र वस्तीतून १९ गणेश मंडळ जातील , तर ६ गणेश मंडळांची स्थापना संवेदनशील भागात आहे.
विसर्जन मिरवणुकीसाठी १ राज्य राखीव पोलीस दल , २ दंगा नियंत्रण पथक , स्टॅकिंग फोर्स , ८ अधिकारी ,७२ पोलीस आणि १०० होमगार्ड आणि वाद्यांचे डेसीबल मीटर असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत ३७ गणेश मंडळे आहेत. त्यात २३ सार्वजनिक व १४ एक गाव एक गणपती स्थापन करण्यात आले आहेत. विसर्जन साठी ३ अधिकारी ,२२ कर्मचारी व २३ होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
उत्कृष्ट गणेश मंडळांचा सन्मान
शहरातील मुंदडा बिल्डर्स , अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ ,नगरपरिषद ,व पोलीस प्रशासनातर्फे शिस्तीत मिरवणूक काढणारे , गुलाल न उधळणारे , सामाजिक दृष्टिकोनातून आरास ठेवणारे , देशभक्ती रुजवणारे उत्कृष्ट गणेश मंडळांना दगडी दरवाज्याच्या बाहेर मिरवणूकीच्या अंतिम ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रशासनातर्फे मिरवणूक मार्गाची पाहणी
उपविभागीय अधिकारी

महादेव खेडकर , पोलीस उपअधीक्षक सुनील नंदवाळकर , तहसीलदार रुपेशकुमार सुराणा , पोलीस निरीक्षक विजय शिंदे , मुख्याधिकारी प्रशांत सरोदे , सहाययक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे , संजय चौधरी आदींनी शहरातील विसर्जन मिरवणुकीचा मार्गाची पाहणी केली व संवेदनशील स्थळाजवल जादा पोलीस कुमक , गोपनीय पोलीस आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ठिकठिकाणी गणेश विसर्जन करताना ब्रेकेट्स व घ्यायची काळजी आणि चोख बंदोबस्त ,संकलन केंद्राची जागा निश्चिती करण्यात आली.