शालेय जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा
मुलींमध्ये एम जे तर मुलांमध्ये गोदावरी अंतिम विजेता..

जळगाव ( प्रतिनिधि)
खेळाडूंनी ना नफा ना तोटा व्यवसाय करून आपले करियर घडवावे – जाकीर शिकलगर
खेळाडूंमध्ये असलेली चिकाटी वृत्ती व आव्हान स्वीकारण्याची प्रवृत्ती यामुळे तो व्यवसायात नक्कीच यशस्वी होतो म्हणून विद्यार्थ्यांनी प्र
थम ना नफा ना तोटा इथून व्यवसायाची सुरुवात केल्यास तो निश्चितच यशस्वी होईल यात शंका नाही असे मत एम एम एन एफ (महाराष्ट्र मायनॉरिटी एनजिओ फोरम) चे राज्याचे अध्यक्ष जाकीर शिकलगार (पुणे) यांनी व्यक्त केले ते क्रीडा संकुल येथे १९वर्ष
आतील मुलं आणि मुलींच्या आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेचा समारोपप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर त्यांचे सहकारी अब्दुल मजीद, (कतर) अहसान सय्यद (वरणगाव) जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष जफर शेख (पिंच बोटेलिंग एम डी) सचिव फारूक शेख, सहसचिव अब्दुल मोहसीन, संचालक मनोज सुरवाडे व ताहेर शेख आदी उपस्थित होते.

फुटबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स हाऊस तर्फे विजेते व उप विजेते संघास प्रमुख अतिथी च्या हस्ते ट्रॉफी देण्यात आली..
१९ वर्षा आतीलफुटबॉल स्पर्धेचा अंतिम निकाल
मुले
१. ॲड एस बाहेती वि. वि नूतन मराठा१-०
२. गोदावरी वि. वि एस व्ही के एम (एम जे) १-०
३. छत्रपती वि. वि पोदर ५-०
४. इकरा शाईन वि. वि अँग्लो उर्दू २-०
उपांत फेरी
५. छत्रपती वि. वि ॲड.एस बाहेती ३-२( पेनल्टी)
६. गोदावरी वि. वि ईकरा शाईन १-०
अंतिम सामना
७. गोदावरी वि. वि छत्रपती
४-२ ( पेनल्टी)
मुली
१. एस व्ही के एम (एम जे) वि. वि पोदार ४-० ( पेनल्टी)
अंतिम सामना
२. एस व्ही के एम (एम जे) वि. वि बेंडाळे ३-०
फोटो